शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बलात्काराच्या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये सफाई कामगार निघाला ड्रग्ज तस्कर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 7:45 PM

मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येऊन हि कारवाई केल्याने खळबळ उडाली होती

ठळक मुद्देअलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अलगीकरण कक्षात सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडी असतानाच आता मुंबई पोलिसांनी पकडलेला अमली पदार्थ विक्रेता हा पालिकेच्या याच अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून कामाला होता असे उघडकीस आले आहे.मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ पालिकेच्या अलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती. हे दोघेही आरोपी नालासोपाराचे राहणारे आहेत. या आरोपींनी भाईंदरच्या  बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्या कडून चरस घेतल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते .मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येऊन हि कारवाई केल्याने खळबळ उडाली होती. त्या नंतर नवघर पोलीस देखील सक्रिय झाले व त्यांनी बल्ली यादव याला गुरुवारी रात्री अटक केली . यादव हा नेपाळ वरून उत्तर प्रदेश - बिहार मार्गे चरस आणत असे व अन्य मागणी धारकांना तो पुरवत असे असे. नवघर पोलिसांनी बल्ली यादवची चौकशी केली असता अटक आरोपी अविनाश सिंह हा अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता आणि १२ सप्टेंबर रोजीच त्याला चरसचा पुरवठा केला होता असे चौकशीत उघड झाले .दरम्यान अविनाश सिंह हा पालिकेने साफसफाईचा ठेका दिलेल्या ठेकेदार सिटीझन अलाइट या ठेकेदाराचा ठेक्यावरील कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे . तो जून पासून पालिकेच्या अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता . मुंबई पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी त्याला पकड्ले त्यावेळी देखील तो कामावर हजर होता . त्या नंतर मात्र तो कामावर आलेला नाही असे अलगीकरण कक्षातून सूत्रांनी सांगितले. बल्लीने चरसचा साठा दिला तो अविनाश याने अलगीकरण कक्षातच ठेवला होता असा संशय आहे . शिवाय या आधी त्याने चरसची तस्करी व विक्री केल्याची शक्यता आहे . त्या अनुषंगाने आता नवघर पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले .पालिकेच्या सदर अलगीकरण कक्षात सैनिक सिक्युरिटी या ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकाने अलगीकरण कक्षात ठेवलेल्या २० वर्षीय नवविवाहितेवर सलग तीन रात्र बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर विक्रम शेरे याला अटक करण्यात आली . त्यावरून पालिकेवर टीकेची झोड उठली असतानाच आता सिटीझन अलाइट या ठेकेदाराच्या सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांनी चरस प्रकरणी अटक केल्याने पालिका आणि सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड वाढली आहे. वास्तविक सदरचे ठेके अनावश्यक किंवा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी घेऊन पालिकेची लूट चालवली जात आहे . तसेच मर्जीतील ठेकेदारास देतानाच या मागे राजकीय लागेबांधे देखील गुंतले असल्याने ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप होत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकmira roadमीरा रोडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसRapeबलात्कार