शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पुरातन मूर्तीची तस्करी करणाऱ्या दोघांवरील डीआरआयच्या कायदेशीर प्रक्रियेला जोर   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 7:34 PM

शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हॉंगकॉंगला पाठवल्याचे तपासात पुढे आले आहे. याशिवाय पार्वती व गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून चोरण्यात आल्याचा संशय त्यांच्यावर आहे.

मुंबई - देशात पुरातन मूर्तीची तस्करी करणाऱ्या अनिवासी भारतीय आरोपींविरोधात आता महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाईचा बडगा उचलला आहे. विजय नंदा आणि उदित जैन अशी या दोघींची नावे आहेत. परदेशी नागरिकत्व असलेल्या या आरोपींविरोधात डीआरआयने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. 

देशातील १३ पुरातन मूर्तीची तस्करी अमेरिका, लंडन आणि हाँगकाँग येथे तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गोरेगाव येथे नंदा यांच्या घरावर कारवाई करत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १३ पुरातन मूर्ती जप्त करत अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, १७ आणि १८ व्या शतकातील महिषासूरमर्दिनीच्या मूर्ती, गणेशाच्या कांस्यमूर्ती, तसेच १൦-११ व्या शतकातील दक्षिण भारताच्या मंदिरातून उखडून आणलेल्या वरद गणेश, पद्मपाणी, अवलोकितेश्वर, उभा विष्णू, नाग-नागीण आदी मुर्त्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या. नंदा यांना १६ कोटी १८ लाखांचा दंड आकारण्यात आला. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी किंमतीच्या ४७ मूर्त्या जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुर्त्या परदेशात नेण्यासाठी नंदाला मदत करणाऱ्या कंपनीलाही संबंधित विभागाने दंड आकारला आहे. 

शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हॉंगकॉंगला पाठवल्याचे तपासात पुढे आले आहे. याशिवाय पार्वती व गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून चोरण्यात आल्याचा संशय त्यांच्यावर आहे. त्यासाठी नंदा नवी दिल्लीत येऊन जैनला भेटला होता. प्रत्येक एका मुर्तीमागे जैनला २५ हजार रुपये दिले जात होते.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय