शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

विदेशात उच्चशिक्षणाचे स्वप्न भंगले; सात लाखांना ऑनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 20:50 IST

संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

ठळक मुद्देप्रमाणपत्राचे आमिष ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले

नाशिक : जर्मनीमध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका युवकाला संशयित सायबर गुन्हेगाराने तब्बल ७ लाख ६ हजार ८३८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी युवकाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, राजेंद्र गोविंद सोनवणे (रा. मराठानगर, जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले व जर्मनीत जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेले ह्यआयईएलटीएसह्ण परीक्षेचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे मिळवून देण्याचे आश्वासन समोरच्या भामट्याने दिले. त्यासाठी त्याने पैशांची मागणी केली. प्रमाणपत्र थेट मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडत सोनवणे यांनी त्या अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत सुमारे ७ लाख ६ हजार ८३८ रुपये ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पाठविले. यानंतर संशयित सायबर गुन्हेगाराने कुठलेही प्रमाणपत्र सोनवणे यांना दिले नाही. त्यानंतर आपली गुन्हेगाराकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. दरम्यान, सोनवणे यास ज्या दोन कमांकांवरून फोन आले ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून तंत्रविश्लेषण शाखेच्या माध्यमातून केला जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयEducationशिक्षणfraudधोकेबाजीonlineऑनलाइनcyber crimeसायबर क्राइम