शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 1:15 AM

कुत्र्याला द्यायचे कारण देत मागितले इंजेक्शन; मृत्यूच्या दिवशी डाॅ. शीतल आमटे घराबाहेर पडल्या नाहीत

राजेश भोजेकरचंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील आनंदवन येथील रुग्णालयाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दिशेनेदेखील तपासाची चक्रे फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मृत्यू झाल्याच्या दिवशी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे बाहेरच पडल्या नव्हत्या. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु त्यादिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत.

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्युला पाच दिवसाचा कालावधी लोटूनही मृत्युचे गूढ उकलले नाही. परंतु डाॅ. शीतल आमटे यांनी मृत्युपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून नागपूर येथून पाच इंजेक्शन मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे, मात्र त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाइल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. 

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळलेडाॅ. शीतल यांच्या मृत्युप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. तर डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू विषारी इंजेक्शन टोचल्याने झाल्याचा संशय पोलीस वर्तवत आहेत. इंजेक्शनची खूण त्यांच्या उजव्या हाताला असल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. डाॅ. शीतल आमटे या डावखुऱ्या नव्हत्या. मग त्यांनी उजव्या हाताला इंजेक्शन कसे घेतले? ही बाब पोलिसांना विचार करायला लावणारी असल्याचे समजते. यामागे अन्य कारण तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.  

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेSuicideआत्महत्याPoliceपोलिस