शेजारच्या तरुणीवर जडला जीव, डॉक्टर निलेशने पत्नी सीमाची केली हत्या, अपघात वाटावा म्हणून कार जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:02 IST2026-03-24T13:57:41+5:302026-03-24T14:02:29+5:30

Doctor Killed Wife Crime News : 25 वर्षाच्या तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध पत्नीला कळल्यानंतर डॉक्टर निलेश याने पत्नी सीमाची हत्या केली. अपघात वाटावा म्हणून मृतदेह कारमध्ये ठेवून ती पेटवली.

Dr. Nilesh killed his wife Seema, burned the car to make it look like an accident | शेजारच्या तरुणीवर जडला जीव, डॉक्टर निलेशने पत्नी सीमाची केली हत्या, अपघात वाटावा म्हणून कार जाळली

शेजारच्या तरुणीवर जडला जीव, डॉक्टर निलेशने पत्नी सीमाची केली हत्या, अपघात वाटावा म्हणून कार जाळली

पत्नीचा कारला आग लागून झालेल्या दुर्घटनेत जळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना देणारा डॉ. निलेश पटेल याचा पोलिसांनी भांडाफोड केला. शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू असलेल्या आरोपी निलेशने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची हत्या केल्याचे तपासातून निष्पन्न झाले. 

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात घेऊन जात असतानाच कारला आग लागली आणि जळून तिचा मृत्यू झाल्याचे आरोपी डॉ.निलेशने पोलिसांना सांगितले होते. 

तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध पत्नीला कळले अन्...

आरोपी डॉ. निलेश याने पोलिसांना सांगितले की, त्याचे शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू आहेत. या विवाहबाह्य संबंधांची माहिती पत्नी सीमा (वय ३८) हिला कळाली. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. दररोज होत असलेल्या वादामुळे मी सीमाची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांनी सांगितले की आरोपीने शुक्रवारी (२० मार्च) रात्री आरोपी निलेशने आधी पत्नी सीमाचा गळा दाबला आणि हत्या केली. हत्या केल्याचे लपवण्यासाठी त्याने नंतर अपघाताचा बनाव रचला. 

सीमाच्या आईवडिलांना म्हणाला तिला ह्रदयविकाराचा झटका आला...

हत्या केल्यानंतर आरोपी निलेशने सीमाच्या आईवडिलांना कॉल केला आणि सीमाला ह्रदयविकाराचा झटका आला आहे आणि तिला रुग्णालयात घेऊन जात आहे, असे खोटे सांगितले. 

त्यानंतर आरोपीने त्याच्या रुग्णालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनाही हत्येच्या या कटात सहभागी करून घेतले. त्यांना बोलावून घेतले आणि पेट्रोल टाकून कारला आग लावली. 

पोलिसांना म्हणाला, कारचा अपघात, पत्नीचा आगीत मृत्यू

कार पेटवल्यानंतर आरोपी निलेश याने पोलिसांना कॉल केला आणि सांगितले की कारचा अपघात झाला. त्यानंतर सीएनजी स्फोट होऊन आग लागली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांना या प्रकरणात सुरुवातीला शंका आली. फॉरेन्सिक तपासात काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आणि तपासाला वेग आला. 

अपघातानंतर कारला आग लागून जळालेल्या व्यक्तीच्या मृतदेहासारखे यात नव्हते. त्यातच सीमाच्या कुटुंबीयांनी निलेशवर शंका उपस्थित केल्या. त्याचे तरुणीसोबत संबंध आहे. त्यामुळेच त्याने हत्या केली, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यात त्याने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

Web Title : डॉक्टर ने अफेयर के चलते पत्नी की हत्या की, कार दुर्घटना का नाटक रचा

Web Summary : डॉक्टर नीलेश पटेल ने अपनी पत्नी सीमा की हत्या कर दी, क्योंकि उसे पड़ोसन के साथ उसके अफेयर का पता चल गया था। अपराध छिपाने के लिए अस्पताल के कर्मचारियों की मदद से कार दुर्घटना का नाटक किया, लेकिन पुलिस ने सच्चाई उजागर कर दी।

Web Title : Doctor Kills Wife Over Affair, Stages Car Accident Cover-Up

Web Summary : Doctor Nilesh Patel murdered his wife, Seema, after she discovered his affair with a neighbor. He staged a car accident with help from hospital staff to conceal the crime, but police uncovered the truth.