गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:57 IST2025-11-28T06:57:06+5:302025-11-28T06:57:30+5:30
डॉ. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले

गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई - डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणात गुरुवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात खळबळजनक माहिती दिली. मृत गौरी व आरोपी पती अनंत गर्जे याच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही मिळाले असून, त्याची तपासणी करून आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले.
दाेन डिसेंबरपर्यंत वाढविली पोलिस कोठडी
डॉ. गौरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी दाेन डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अनंतच्या दोघा भावंडांचा शोध सुरू असून, त्यांना अटक करण्यासाठी अनंत गर्जेची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.