अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार, विशेष CBI कोर्टात अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:32 IST2022-05-26T14:31:46+5:302022-05-26T14:32:50+5:30
Sachin Vaze : सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; सचिन वाझे माफीचा साक्षीदार, विशेष CBI कोर्टात अर्ज दाखल
मुंबईतील बार वसुलीप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळून वाझेने थेट ईडीकडेच माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली होती. याबाबत सचिन वाझेंनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. सचिन वाझेंच्या या अर्जामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारला तर त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात.
सचिन वाझेच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सचिन वाझेला खटल्याला सामोरं जावं लागणार नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचं सचिन वाझेंनी या लेखी पत्रात म्हटलं होतं. आता याच प्रकरणात सचिन वाझेंनी भादंवि कलम 306 अंतर्गत वकील रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.