बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:58 IST2021-05-19T21:58:03+5:302021-05-19T21:58:32+5:30
Crime news : ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे.

बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून
राजस्थानातील जोधपूरमध्ये मुलीनेच स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे. या मृत नराधम बापास दारुचे व्यसन जडलेले होते.
मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीच्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीने केला आहे. नात्याला काळिमा फासणारा नराधम बाप नेहमीच आपल्या मुलीला मद्यपान करून छळत असे. सोमवारी रात्री त्याने हद्दच पार केली आणि मुलीचे कपडे फाडत तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आपली सुटका करून घेत असताना हाताला सापडलेल्या काठीने बापाच्या डोक्यावर प्रहार केला. जोरदार प्रहाराने बाप जमिनीवर पडला आणि खूप रक्तस्त्राव होऊ लागला.
या घडलेले घटनेने घाबरलेली मुलगी आपल्या आईजवळ जावून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मथुरादास माथूर रूग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपायुक्त धर्मेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वय अंदाजे ४० वर्षे होते आणि त्याला दारुचे खूप व्यसन होते. कुटुंबियांच्या चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, तो भांडणखोर स्वभावाचा होता. त्याचे पत्नीबरोबर नेहमी वाद होत असत. यापूर्वीही त्याने आपल्या मुलीशी गैरवर्तन केले होते. मात्र, घरातील लोकांनी अब्रू जाईल म्हणून याबाबत बाहेर वाच्यता केली नव्हती. याशिवाय त्याने पत्नीला एकदा जाळण्याचाही प्रयत्नही केला होता.
मुस्कटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... https://t.co/YJAzNaDffm
— Lokmat (@MiLOKMAT) May 19, 2021
सोमवारी मध्यरात्री या नराधम बापाने हद्द पार करत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर बळजबरी शोषण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतप्त मुलीने रागाच्या भरात केलेल्या काठीच्या प्रहाराने त्याला जीव गमवावा लागला.