A different twist in Sushant's case, rhea's CA inquiry from ED | सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

सुशांत प्रकरणात वेगळं वळण, ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी

ठळक मुद्देमुंबई पोलीस मुख्य करून सुशांतप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी तपासात वेळ वाया घालवत आहेत.

नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मंगळवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या चार्टर्ड अकाउंटंटची विचारपूस करत आहे. ही चौकशी मुंबईतील ईडी शाखेत सुरू आहे. असे सांगितले जात आहे की, ईडीला रितेश शहाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत.

त्याच वेळी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येविषयी देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, आज बिहार सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. सुशांतचा मृत्यू कसा झाला याबद्दल देशभर चिंता निर्माण झाली आहे. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर बिहार पोलिस त्याचा तपास करत आहेत. पण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बिहारच्या पोलिस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली ती न्याय्य नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांनी आधीच सांगितले होते की, जर सुशांतच्या वडिलांना हवे असेल तर या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल. आज या आधारे बिहार सरकारने याची शिफारस केली आहे.

मुंबई पोलीस पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ वाया घालवत आहेत 

सुशांतचे वडील के के सिंग यांचे वडील विकास सिंग यांनी असा दावा केला आहे की, मुंबई पोलीस मुख्य करून सुशांतप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी तपासात वेळ वाया घालवत आहेत. म्हणून आम्ही या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत शिफारस देखील केली आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस

 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

 

मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली 

Web Title: A different twist in Sushant's case, rhea's CA inquiry from ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.