शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता, तरीही जेलमध्येच राहणार; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:13 IST

Gurmeet Ram Rahim acquitted in journalist murder case: पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या २००२च्या हत्येप्रकरणी राम रहीमला झालेली शिक्षा

Gurmeet Ram Rahim acquitted in journalist murder case: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेपत्रकार छत्रपती हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयात अंशतः बदल करत उच्च न्यायालयाने राम रहीमला संशयाचा फायदा दिला. या प्रकरणातील इतर तीन दोषी कुलदीप, निर्मल आणि किशन लाल यांची मात्र जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आरोपींनी केलेल्या याचिकेनंतर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.

पंचकुला सीबीआय न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी या प्रकरणातील इतर तीन दोषी कुलदीप, निर्मल आणि किशन लाल यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. तर डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी मानले गेले होते. सुनावणी दरम्यान पुरेसे साक्षी-पुरावे नसल्याने, विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आधीच्या निर्णयात अंशतः बदल करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पत्रकार हत्या प्रकरणातून गुरमीत राम रहीमला निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि युक्तिवादांचा तपशीलवार विचार केल्यानंतर न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना संशयाचा फायदा दिला आणि त्यांच्यावरील आरोप पुरेसे सिद्ध झाले नसल्याच्या आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

राम रहीम तुरुंगातच राहणार

२०१९ मध्ये सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या २००२च्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जवळजवळ सात वर्षांनंतर, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम यांना त्याच प्रकरणात महत्त्वपूर्ण दिलासा दिला. तथापि, इतर प्रलंबित प्रकरणांमुळे राम रहीम तुरुंगातच राहणार आहे.

उच्च न्यायालयाने निर्णयाविरुद्ध धाव घेतली

या प्रकरणातील २०१९च्या निकालाविरुद्ध गुरमीत राम रहीमने अपील दाखल केले होते, ज्यामध्ये आज न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. गुरमीत राम रहीम दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तो सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. तथापि, तो वेळोवेळी पॅरोलवर सुटतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Rahim acquitted in journalist murder case, remains in jail.

Web Summary : High Court acquitted Gurmeet Ram Rahim in the journalist murder case due to lack of evidence, overturning a CBI court ruling. However, he remains jailed due to other pending cases, including a rape conviction. Three other convicts' life sentences were upheld.
टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमHigh Courtउच्च न्यायालयJournalistपत्रकारDeathमृत्यू