कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 19:53 IST2020-06-15T19:52:25+5:302020-06-15T19:53:29+5:30

जेलच्या पूर्व विभागातील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Deputy Inspector General of Prisons Swati Sathe transferred to Nagpur | कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

ठळक मुद्देगृह विभागाच्यावतीने साठे यांच्या बदलीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. कारागृहाच्या नागपूरमधील पूर्व विभागाचे उपमहानिरीक्षक पद काही महिन्यापासून रिक्त होते.

मुंबई - तुरुंग विभागाच्या पुण्यातील मुख्यालयात कार्यरत असलेल्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. जेलच्या पूर्व विभागातील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

गृह विभागाच्यावतीने साठे यांच्या बदलीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली करण्यात आली असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. कारागृहाच्या नागपूरमधील पूर्व विभागाचे उपमहानिरीक्षक पद काही महिन्यापासून रिक्त होते. त्याचा अतिरिक्त कार्यभार अमरावती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांच्याकडे होता. त्याकडे वरिष्ठ अधिकारी नेमणे आवश्यक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बेठकीत साठे यांची त्या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

Web Title: Deputy Inspector General of Prisons Swati Sathe transferred to Nagpur