Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:11 IST2025-11-12T16:10:52+5:302025-11-12T16:11:38+5:30

Delhi Blast : दिल्ली स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला.

delhi red fort blast terrorists code word in chatbox daawat for blast biryani used explosive nia investigation | Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. तपास यंत्रणा जसजसा तपास करत आहे तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे. स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला.

दिल्ली स्फोटासाठी प्रामुख्याने अशा कोडवर्डचा वापर केला ज्यामुळे कोणालाच संशय येणार नाही. दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले. 'दावत के लिए बिरयानी तैयार है' असं म्हटलं. हे कोडवर्ड वापरूनच संपूर्ण भयंकर कट रचला होता. यामध्ये 'दावत' म्हणजे स्फोट किंवा हल्ला, तर 'बिर्याणी' म्हणजे स्फोटक पदार्थ. सायबरपासून वाचण्यासाठी ही युक्ती वापरली जात होती.

 "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू

रिपोर्टनुसार, हा मेसेज शाहीनकडून पाठवण्यात आला होता, एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासणीदरम्यान हा खुलासा झाला आहे. तपासात स्पष्टपणे दिसून येतं की, लाल किल्ला स्फोट हे एका संघटित मॉड्यूलचं काम होतं. दिल्ली पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे.

वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट

२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. हरियाणातील फरीदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकीलच्या दोन खोल्यांमधून २९०० किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. यानंतर आता त्याच्या फोनची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. २६ जानेवारी आणि दिवाळीला लाल किल्ल्यावर स्फोट घडवण्याचा त्याचा प्लॅन होता. तसेच डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली होती.

Web Title : दिल्ली विस्फोट: चैट में बिरयानी कोडवर्ड का खुलासा, चौंकाने वाला खुलासा।

Web Summary : दिल्ली विस्फोट में विस्फोटकों के लिए 'बिरयानी' कोडवर्ड का इस्तेमाल किया गया। जांच में लाल किले पर गणतंत्र दिवस, दिवाली पर हमले की योजना का खुलासा हुआ। एनआईए जांच जारी है।

Web Title : Delhi Blast: Biryani codeword revealed in chat, shocking disclosure.

Web Summary : Delhi blast used 'biryani' codeword for explosives. Investigation reveals plotters planned attacks on Republic Day, Diwali at Red Fort. NIA investigation continues.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.