Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:18 IST2025-08-30T12:13:06+5:302025-08-30T12:18:07+5:30
Kalkaji Mandir Video: मंदिरात सेवा करणाऱ्याच्या हत्याकांडाने दिल्ली हादरली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद आणि देवीचा चुनरी (खण) मिळाला नाही. त्या रागातून थेट सेवेकऱ्याला भररस्त्यातच इतकं मारलं की त्याचा जीव गेला.

Delhi Murder Video: भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, सेवेकऱ्याला जीव जाईपर्यंत मारलं; दिल्ली हादरली
Kalkaji Temple News: कालका देवीच्या सेवेकऱ्याच्या हत्येने दिल्ली हादरली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीच हे राक्षसी कृत्य केले. सेवेकऱ्याने प्रसाद आणि देवीची चुनरी न दिल्यानं राग आला आणि त्यांनी थेट सेवेकऱ्याला दाडक्यांनी मरेपर्यंत मारलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, कालकाजी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. कालकाजी मंदिर परिसरात वाद सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात कॉल देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
लाथा-बुक्क्या आणि काठ्या, आरोपी सेवेकऱ्यावर तुटून पडले
काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले की आरोपींनी दर्शन घेतले. पण त्यांना प्रसाद आणि देवीची चुनरी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी सेवेकऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर थेट काठ्या घेऊन आरोपी तुटून पडले.
Heights of lawlessness in Delhi. Yogesh Singh, a Sewadar at Kalkaji Temple was beaten to death by a mob of devotees after a scuffle broke out between them over the demand of "chunni prasad" at the temple. pic.twitter.com/QIDW8FYNdd
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) August 30, 2025
यात ३५ वर्षीय सेवेकरी योगेंद्र सिंह गंभीर जखमी झाला. तो उत्तर प्रदेशातील हरदोईतील फत्तेपूर येथील रहिवाशी होता. रक्तबंबाळ अवस्थेत योगेंद्रला दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. योगेंद्र मागील १५ वर्षांपासून मंदिरात सेवेकरी म्हणून होता.
अटक करण्यात आलेला आरोपी कोण?
कालकाजी पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले. तर एकाला मंदिरातील लोकांनी पकडले. त्याची ओळख पटली असून, अतुल पांडे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.