'स्पेशल २६' स्टाईलने मालकाच्या घरी ED ची धाड; मोलकरीणच मास्टरमाईंड, ३५० CCTV तपासले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:52 IST2026-02-26T15:51:58+5:302026-02-26T15:52:46+5:30

घरातील मोलकरणीनेच आपल्या मालकाच्या घरी ईडी (ED) ची बनावट धाड टाकली.

delhi friends colony maid orchestrated fake ed raid on her employer house | 'स्पेशल २६' स्टाईलने मालकाच्या घरी ED ची धाड; मोलकरीणच मास्टरमाईंड, ३५० CCTV तपासले अन्...

'स्पेशल २६' स्टाईलने मालकाच्या घरी ED ची धाड; मोलकरीणच मास्टरमाईंड, ३५० CCTV तपासले अन्...

दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात एक अजब घटना समोर आली आहे, जिथे घरातील मोलकरणीनेच आपल्या मालकाच्या घरी ईडी (ED) ची बनावट धाड टाकली. दिल्लीपोलिसांनी मोलकरीण आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांचा युनिफॉर्म, घरातील महागड्या वस्तू आणि शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोलकरणीने पूर्ण प्लॅन करून आपल्या जवळच्या नातेवाईकांना या कटात सामील केलं होतं. तिने घराची सर्व माहिती साथीदारांना दिली आणि 'स्पेशल २६' चित्रपटासारखा प्लॅन तयार केला. घरात कोण-कोण राहतं आणि काय करतं याची पूर्ण माहिती यासाठी उपयुक्त ठरली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

ठरलेल्या वेळेनुसार ईडीचे अधिकारी बनून ही टीम घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचली. घरात उपस्थित असलेल्या लोकांना हे अधिकारी बनावट आहेत याची पुसटशी कल्पनाही आली नाही. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या तीन व्यक्तींनी ईडी अधिकारी असल्याचं भासवून न्यू फ्रेंड्स कॉलनीतील ८६ वर्षीय सेवानिवृत्त आर्किटेक्ट आर.सी. सभरवाल यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. या टीमने कुटुंबाला धमकावलं, त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि झडती घेण्याचं नाटक केलं. नातवाने जेव्हा उलटतपासणी सुरू केली आणि प्रश्न विचारले तेव्हा संशयित सुमारे ३-४ लाख रुपये रोख आणि ७ महागडी घड्याळे घेऊन पसार झाले.

पोलिसांनी ३५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये डी-ब्लॉक निवासी क्षेत्रातील खासगी कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे पाळत ठेवणारे कॅमेरे आणि हाय-स्पीड ट्रॅफिक कॅमेऱ्यांच्या फुटेजचा समावेश होता. या फुटेजच्या आधारे घटनास्थळावरून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यात आला. यामध्ये संशयितांची कार सराय काले खान परिसरातून गाझीपूर बॉर्डर ओलांडून उत्तर प्रदेशात प्रवेश करताना दिसली. या सुगाव्यामुळे पोलीस गाझियाबादमधील वैशालीच्या सेक्टर ४ पर्यंत पोहोचले, जिथे ती कार उभी असल्याचं आढळलं.

संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी कारचा वापर केला होता, परंतु सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना कारचा नंबर मिळाला. गाझियाबादमध्ये कार सापडल्यानंतर टीमने टेक्निकल सर्व्हिलन्सचा वापर करून हे शोधून काढलं की, गुन्ह्याच्या वेळी न्यू फ्रेंड्स कॉलनी आणि वैशाली पार्किंग परिसरात कोणते मोबाईल नंबर सक्रिय होते. या डेटावरून पोलिसांना थेट पूजा राजपूतच्या घराचा पत्ता मिळाला. तक्रारदाराची मोलकरीण रेखा देवी ही वारंवार गाझियाबादमधील त्याच पत्त्यावर येत-जात असे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने खुलासा केला.

२५ फेब्रुवारी रोजी जेव्हा पोलीस टीमने पूजाच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांना बनावट धाडीत वापरलेलं साहित्य सापडलं. यामध्ये आयटीबीपी (ITBP) च्या डेप्युटी कमांडंटचा पूर्ण गणवेश सापडला, ज्याचा वापर दरोड्यादरम्यान दरारा निर्माण करण्यासाठी केला गेला होता. तसेच एक वायरलेस सेट टॉप बॉक्स आणि बनावट ओळखपत्रंही सापडलं. घरात लपवून ठेवलेली ७ महागडी चोरीची घड्याळं आणि दागिनेही जप्त करण्यात आले. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी या रॅकेटशी संबंधित दोन महिलांना अटक करण्यात आली. सभरवाल यांची मोलकरीण या प्रकरणाची मास्टरमाईंड निघाली. 

Web Title : नौकरानी बनी मास्टरमाइंड, दिल्ली में ED की नकली छापेमारी; CCTV से खुला राज

Web Summary : दिल्ली में, एक नौकरानी ने 'स्पेशल 26' की तरह अपने मालिक के घर पर ED की नकली छापेमारी करवाई। उसने रिश्तेदारों को शामिल किया, अंदर की जानकारी दी। पुलिस ने 350 CCTV कैमरों का विश्लेषण कर आरोपियों को उत्तर प्रदेश से पकड़ा, चोरी का सामान बरामद किया।

Web Title : Maid Masterminds Fake ED Raid on Delhi Home; CCTV Unravels Plot

Web Summary : In Delhi, a maid orchestrated a fake ED raid on her employer's home, mirroring 'Special 26'. She involved relatives, providing inside information. Police, analyzing 350 CCTV cameras, tracked the suspects to Uttar Pradesh, recovering stolen valuables and arresting the culprits.