एक हत्या, दोन आरोपी, 170 सीसीटीव्ही, 230 जणांची चौकशी अन् 600 किमी अंतरावर पुरावा; असा झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:21 PM2021-08-12T12:21:31+5:302021-08-12T12:26:29+5:30

Crime News : आग्रा, कानपूर, फतेहपूर आणि लखनऊसह अनेक जिल्ह्यात तपास करण्यात आला. जवळपास 600 किमीचा प्रवास केल्यानंतर पोलिसांना आरोपी बाराबंकीमध्ये असल्याची माहिती मिळाली.

delhi ex girlfriend conversation knife murder accused absconding barabanki arrest reveal police crime | एक हत्या, दोन आरोपी, 170 सीसीटीव्ही, 230 जणांची चौकशी अन् 600 किमी अंतरावर पुरावा; असा झाला उलगडा

एक हत्या, दोन आरोपी, 170 सीसीटीव्ही, 230 जणांची चौकशी अन् 600 किमी अंतरावर पुरावा; असा झाला उलगडा

Next

नवी दिल्ली - देशात एक भयंकर घडना घडली आहे. एका हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. एक हत्या, दोन आरोपी, 170 सीसीटीव्ही कॅमेरे, 230 लोकांची चौकशी आणि 600 किमी अंतरावर पुरावा सापडल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यासाठी आरोपीने बटण असलेला चाकू ऑनलाईन शॉपिंग एपच्या मदतीने ऑर्डर केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी ही भयंकर घटना घडली. दिल्लीमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. मंगोलपूरी पोलीस ठाणे परिसरातील पार्किंगसमोर सैफ नावाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा, कानपूर, फतेहपूर आणि लखनऊसह अनेक जिल्ह्यात तपास करण्यात आला. जवळपास 600 किमीचा प्रवास केल्यानंतर पोलिसांना आरोपी बाराबंकीमध्ये असल्याची माहिती मिळाली. तसेच 170 सीसीटीव्हीचे कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करण्यात आले. 

याप्रकरणाच्या तपासासाठी 230 व्यक्तींची चौकशी करण्यात आली. यानंतर बाराबंकी बस स्टँडच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी आपली टीम तैनात करून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी असद उर्फ बिल्ला आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपीने नववीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तो दिल्लीमध्ये आला आणि तिथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं. याच दरम्यान तो एका तरुणीच्या संपर्कात आला. लॉकडाऊनमध्ये तो कानपूरला परत गेला. तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअप केलं.

काही दिवसांनी आरोपीला आपली गर्लफ्रेंड सैफ नावाच्या एका तरुणाच्या संपर्कात आहे. ती त्याच्याशी जास्त बोलते. यामुळे तो संतापला. संतापाच्या भरात त्याने सैफला असं न करण्याचा धमकीवजा इशारा दिला. मात्र सैफने त्याचं ऐकून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी दिल्लीला आला. त्याने ऑनलाईन ऑपिंग एपच्या मदतीने एक चाकू खरेदी केला, सैफला भेटण्यासाठी एका पार्कमध्ये बोलावलं आणि आपल्या एका अल्पवयीन साथीदारासह त्याची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: delhi ex girlfriend conversation knife murder accused absconding barabanki arrest reveal police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.