गर्लफ्रेंडला छेडल्याचा विरोध; राजधानी दिल्लीत विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 19:08 IST2023-06-18T18:55:30+5:302023-06-18T19:08:03+5:30
Delhi DU Student Murder: मृत निखिल चौहान प्रथम वर्षात शिकत होता.

गर्लफ्रेंडला छेडल्याचा विरोध; राजधानी दिल्लीत विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून
Crime News : राजधानी दिल्लीतील साऊथ कॅम्पस पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या आर्यभट्ट कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची (वय 19) भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या झाली आहे. हत्येचा आरोप कॉलेजच्याच एका विद्यार्थ्यावर आहे. काही दिवसांपूर्वी मृत तरुणाच्या गर्लफ्रेंडसोबत गैरवर्तन केल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.
आज मृत निखिल चौहान कॉलेजच्या गेटबाहेर एकटाच असताना संधी साधून आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पुष्टी करताना डीसीपी मनोज सी म्हणाले की, पोलिसांना चरक पालिका रुग्णालयातून या प्रकरणाची माहिती मिळाली होती. या गटनेत बिहारचा रहिवासी असलेल्या निखिल चौहानची हत्या झाली आहे. तो आर्यभट्ट कॉलेजमध्ये बीए ऑनर्स पॉलिटिकल सायन्स शिकत होता.
7 दिवसांपूर्वी निखिलच्या गर्लफ्रेंडची महाविद्यालयातील विद्यार्थ्याने छेड काढली होती. यामुळे निखिल आणि आरोपीमध्ये वाद झाला. हाच राग मनात धरुन आरोपींनी आज निखिलवर हल्ला केला. दुपारी कॉलेजच्या गेटबाहेर तीन मुलांनी निखिलवर अचानक चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. छातीवर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला.