Delhi Crime: जगातील सर्वात पवित्र नाते आई आणि मुलाचे आहे. मात्र, देशाची राजधानी दिल्लीतून या नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना समोर आली आहे. मध्य दिल्लीतील हौज काझी भागातील एका ३९ वर्षीय मुलाला आपल्याच ६५ वर्षीय आईवर दोनदा अत्यार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या कृत्याचा आरोपी मुलाला थोडाही पश्चाताप नाही.
आरोपीच्या आईने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलाने वाटत होते की, आपल्या आईचे अनेक वर्षांपूर्वी विवाहबाह्य संबंध आहेत. याचाच राग मनात धरुन आरोपीने आईला शिक्षा देण्यासाठी तिच्यावर अत्याचार केला.
धार्मिक यात्रेवरुन परतल्यानंतर अत्यार केलामहिलेने पोलिसांना सांगितले की, ती निवृत्त सरकारी कर्मचारी पती, आरोपी मुलगा आणि मुलीसोबत हौज काझी परिसरात राहते. १७ जुलै रोजी महिला, तिचा पती आणि धाकटी मुलगी हजसाठी सौदी अरेबियाला गेली होती. हजवरुन परतल्यानंतर १ ऑगस्ट रोजी आरोपीने आईवर अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेली महिला तिच्या मोठ्या मुलीच्या सासरी राहू लागली. ११ ऑगस्ट रोजी ती घरी परतली. त्या दिवशी रात्री आरोपीने पुन्हा आईवर अत्याचार केला.
घाबरलेल्या महिलेने घरातील कोणालाही काही सांगितले नाही. आरोपी इथेच थांबला नाही. १४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास आरोपीने पुन्हा महिलेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर महिलेने लहान मुलीला सर्व काही सांगितले. तिने तिच्या आईला पोलिसांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने मुलाविरुद्ध हौज काझी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.