Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:04 IST2025-11-14T11:03:39+5:302025-11-14T11:04:22+5:30
Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटानंतर अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. आता असा दावा केला जात आहे की दहशतवादी अंदाजे ३२ गाड्यांमधून स्फोटकं घेऊन जाणार होते, त्यात बॉम्ब ठेवणार होते. दिल्लीसह देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, दिल्ली स्फोटांचा तपास करणाऱ्या सूत्रांनी असा दावा केला आहे की देशभरातील सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची योजना होती, ज्यामध्ये मारुती सुझुकी ब्रेझा, मारुती स्विफ्ट डिझायर आणि फोर्ड इकोस्पोर्टसह ३२ गाड्यांचा समावेश होता. ६ डिसेंबर रोजी दिल्लीतील विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी ह्युंदाई आय२० सह सर्व गाड्या वापरण्यात आल्या होत्या.
'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
जप्त केलेल्या बहुतेक गाड्या जुन्या आहेत आणि त्या अनेक वेळा विकल्या गेल्या आहेत. यामुळेच पोलिसांना कार मालकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. चारही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित कार, ब्रेझा (HR87 U 9988) हरियाणाच्या फरिदाबाद येथील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरच्या कॅम्पसमध्ये आढळली. हा परिसर दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून उदयास आला आहे.
व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये एक इकोस्पोर्ट अशीच सोडून देण्यात आली होती. हे व्हाईट टेरर गँग मॉड्यूलचं लपण्याचं ठिकाण असल्याचं मानलं जातं. मागच्या सीटवर झोपलेल्या एका तरुणालाही अटक करण्यात आली होती. त्याची ओळख पटलेली नाही. सोमवारी डिझायर कार जप्त करण्यात आली. कारमध्ये एक असॉल्ट रायफल आणि दारूगोळा सापडला.
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
"मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
सोमवारी सकाळी आय-२० कार बदरपूर सीमा क्रॉसिंगवरून दिल्लीत दाखल झाली. कार अनेक तास शहरात फिरत होती. असं म्हटलं जातं की, लाल किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये तो स्फोट करण्याची योजना होती. अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, उमरने अचानक स्फोटाची योजना आखली होती. सोमवारी गर्दी कमी असते, म्हणून त्याने मेट्रो स्टेशनजवळ आणि लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर स्फोट केला. त्याच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर उमर घाबरल्याचं म्हटलं जात आहे.