Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:00 IST2025-11-13T12:59:35+5:302025-11-13T13:00:38+5:30
Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली.

Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. सोमवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईदचा समावेश आहे. तपास यंत्रणा आता जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी फंडिंगची चौकशी करत आहेत. समोर झालेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सईदला दहशतवादी संघटना जैशकडून फंडिंग मिळत होतं.
जैशच्या सांगण्यावरून शाहीन पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला विंगसाठी रिक्रूटमेंट सेंटर सुरू करण्याचं काम करत होती. शाहीन शहराच्या बाहेरील भागात आणि माणसांची कमी वर्दळ असलेल्या सहारनपूर आणि हापूरमध्ये मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी जागा शोधत होती.
व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
कोण आहे डॉ. शाहीन सईद?
- फरिदाबादमध्ये २,९०० किलो स्फोटकं जप्त केल्यानंतर पोलिसांनी तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक केली.
- अटक केलेल्या लोकांमध्ये शाहीनचा समावेश आहे. ती मूळची लखनौची रहिवासी आहे.
- शाहीनवर भारतातील जैश-ए-मोहम्मदच्या महिला भरती शाखेचा भाग असल्याचा गंभीर आरोप आहे.
- शाहीन पाकिस्तानमधील तिच्या हँडलरच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं.
- दहशतवादी कारवायांसाठी शक्य तितक्या जास्त महिलांची भरती करण्याचे निर्देश तिला देण्यात आले होते.
- शाहीनचा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या जफर हयातशी निकाह झाला होता. २०१५ मध्ये तलाक झाला.
- तलाकनंतर शाहीन हरियाणातील फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात सहभागी झाली आणि तिथे एकटीच राहिली.
"मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
जैश-ए-मोहम्मदच्या माध्यमातून या मॉड्यूलला शाहीन फंडिंग करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तपास यंत्रणा शाहीन, आदिल, उमर आणि मुझम्मिल यांच्या अकाऊंटची तपासणी करत आहेत. शाहीनच्या अकाऊंटमध्ये विदेशी फंडिंगचेही पुरावे सापडले आहेत आणि शाहीनची याबाबत सतत चौकशी केली जात आहे. मौलवी इरफान अहमद हा जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होता आणि त्याला जैशकडून फंडिंग मिळत होतं.