Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:02 IST2025-11-12T13:01:20+5:302025-11-12T13:02:11+5:30
Delhi Blast : डॉ. मोहम्मद उमरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. "मी अत्यंत महत्त्वाचं काम करतोय, मला अजिबात डिस्टर्ब करू नका..." असं उमरने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं.

Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान डॉ. मोहम्मद उमरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. "मी अत्यंत महत्त्वाचं काम करतोय, मला अजिबात डिस्टर्ब करू नका..." असं उमरने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर अनेक महिने त्याच्या कुटुंबाशी देखील बोलला नाही. तो त्याचा फोन बंद करायचा आणि गायब व्हायचा. त्याने सोमवारी घरी येण्याचं कुटुंबीयांना आश्वासन दिलं होतं, परंतु त्यापूर्वीच त्याने घडवलेल्या लाल किल्ल्याजवळील स्फोटानेदिल्ली हादरली. डॉ. मोहम्मद उमर हा दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जात आहे.
२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
उमर अनेक महिने कुटुंबापासून दूर असायचा, कोणाशीच काही बोलायचा नाही. फोन बंद करून गायब व्हायची त्याची जुनी सवय आहे. उमर लाल किल्ल्याजवळील एका पार्किंग लॉटमध्ये सुमारे तीन तास थांबला. त्याने संध्याकाळी ६:५७ वाजता स्फोट केला. तो तीन तास काय करत होता? कोणाची वाट पाहत होता की हाच प्लॅन होता? याबाबत आता तपास सुरू आहे.
हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
डॉ. मुझम्मिलला सोमवारी दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली फरीदाबाद येथे अटक करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद येथे तपासादरम्यान ३६० किलो अमोनियम नायट्रेट, असॉल्ट रायफल्स आणि इतर दारूगोळा जप्त केला. मुझम्मिलची आई नसीमा यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "तो जवळपास चार वर्षांपूर्वीच घरातून निघून गेला होता. तो दिल्लीत डॉक्टर म्हणून काम करत होता."
वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहिणींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
"आम्हाला त्या काळात त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा आम्हाला इतरांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली नाही. दुसऱ्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. ते म्हणत आहेत की माझा मुलगा दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित आहे. मला याची काहीच माहिती नाही. माझ्या दोन्ही मुलांना सोडून द्यावं असं मला वाटत आहे."