Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 10:55 IST2025-11-17T10:54:55+5:302025-11-17T10:55:55+5:30
Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासात एजन्सींनी डॉ. शाहीनशी संबंधित बँक खात्यांची तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
दिल्लीस्फोट प्रकरणाच्या तपासात एजन्सींनी डॉ. शाहीनशी संबंधित बँक खात्यांची तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सूत्रांनुसार, गेल्या सात वर्षांत शाहीनच्या नावावर असलेल्या सात बँक खात्यांमध्ये अंदाजे ₹१.५५ कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे पैसे कोणाला मिळाले आणि ते कुठे पाठवले गेले याची तपशीलवार चौकशी केली जात आहे.
शाहीनच्या नावावर असलेल्या खात्यांपैकी काही खाती खासगी बँकांमध्ये आहेत तर काही सरकारी बँकांमध्ये आहेत. एजन्सींनी कानपूरमध्ये यापैकी तीन, लखनौमध्ये दोन आणि दिल्लीमध्ये दोन खाती सापडली आहेत. २०१४ ते २०१७ दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यवहार सातत्याने होत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये ९ लाख रुपयांचे, २०१५ मध्ये ६ लाख रुपयांचे, २०१६ मध्ये ११ लाख रुपयांचे आणि २०१७ मध्ये १९ लाख रुपयांचे व्यवहार केले गेले. हे पैसे कुठून आले? ते कोणाकडे पाठवण्यात आले होते? तपास यंत्रणा यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
एटीएस आणि एनआयएची मोठी कारवाई
लखनौमधील एटीएस टीमने एक मोठी कारवाई सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयए आणि आयबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पॅरासह राजधानीच्या अनेक भागात सहाहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईचं लक्ष्य डॉ. शाहीन आणि डॉ. परवेझ यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क असलेल्या व्यक्ती आहेत.
भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं , पण...
१३ संशयितांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएसने १३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण या दोन्ही आरोपींच्या सतत संपर्कात असल्याचा आणि संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जसजसा वाढत आहे, तसतसा एनआयए, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि दिल्ली पोलीस आता संयुक्त तपास करत आहेत.
दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
सतत शोध मोहीम सुरू आहे आणि असंख्य डिजिटल उपकरणे, मोबाईल चॅट आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, हे संपूर्ण नेटवर्क अनेक राज्यांमध्ये पसरू शकतं, त्यामुळे या कारवाईची व्याप्ती सतत वाढवली जात आहे. शाहीन आणि परवेझच्या संपर्कात असलेल्या लोकांची यादीही वाढत आहे.