Crime News : धर्म परिवर्तन करून १५ वर्षांच्या मुलीशी केला जात होता निकाह; महिला आयोगानं ऐनवेळी छापा मारताच....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:26 PM2021-03-19T19:26:06+5:302021-03-19T19:41:32+5:30

Crime News : यावेळी पोलिसांनी तातडीने मुलीचे लग्न थांबवले आणि तिला तिथून बाहेर घेऊन तिचे समुपदेशन केले आणि तिला कायद्याबद्दल समजावून सांगितले.

Delhi 15 years old girl told forced to marry after getting converted from hindu to muslim | Crime News : धर्म परिवर्तन करून १५ वर्षांच्या मुलीशी केला जात होता निकाह; महिला आयोगानं ऐनवेळी छापा मारताच....

Crime News : धर्म परिवर्तन करून १५ वर्षांच्या मुलीशी केला जात होता निकाह; महिला आयोगानं ऐनवेळी छापा मारताच....

Next

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर दिल्लीतील जहांगीरपूर परिसरात एका १५ वर्षीय मुलीचं धर्म परिवर्तन करून निकाह केला जात होता. दिल्लीतील महिला आयोगाच्या लोकांनी या ठिकाणी पोहोचताच छापा मारला आणि निकाह थांबवून मुलीची सुटका केली. दिल्ली पोलिसांना महिला आयोगाला यावेळी मदत केली.

स्थानिक पोलिसांसह मुख्य अधिकाऱ्यांची टीम मुलीच्या घरी पोहोचली आणि जेव्हा पोलिस मुलीशी बोलले तेव्हा मुलीने आपलं वय 15 वर्ष असल्याची कबुली दिली. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार मुलीचा जन्म वर्ष 2005 मध्ये झाला होता. यावेळी पोलिसांनी तातडीने मुलीचे लग्न थांबवले आणि तिला तिथून बाहेर घेऊन तिचे समुपदेशन केले आणि तिला कायद्याबद्दल समजावून सांगितले.

दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित लोकांना स्थानिक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेले आणि आता मुलीचे जबाब घेतले जातील आणि त्यानंतर त्या मुलीला पुढील कारवाईसाठी बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाईल. ही मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातील असून दिल्ली महिला आयोग आता मुलीच्या पुनर्वसनावर काम करणार आहे. 

भाचाच निघाला मारेकरी; जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदाराची हत्या

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, ''१५ वर्षाच्या मुलीचे धर्मांतर करून लग्न केलं जातं होतं. दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात एका १५ वर्षाच्या मुलीचा निकाह केला जात होता हे समजताच आम्ही टीमसह घटनास्थळी पोहोचलो आणि दिल्ली पोलिसांसह आम्ही ते लग्न थांबवले आहे, राजधानी दिल्लीतही बालविवाहाचे प्रकार अजूनही सुरू आहेत. याचीच खंत वाटते. लहान मुलांचे बालपण हिरावून घेत असलेल्यांना कठोर शिक्षा व्हायला हव्यात. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, त्यांना कठोर शिक्षा करण्याची दिल्ली पोलिसांना विनंती केली आहे. आता एकत्रितपणे दिल्ली महिला आयोग या मुलीच्या पुनर्वसनावर काम करेल.''

गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर

दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे आणि मुलीच्या कुटूंबियांना चौकशीसाठी बोलावले आहे, त्याशिवाय ज्या मुलाशी तिचा  निकाह होणार होता.  त्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी नेलं आहे. 

Web Title: Delhi 15 years old girl told forced to marry after getting converted from hindu to muslim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.