गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:26 AM2021-03-19T03:26:49+5:302021-03-19T06:42:48+5:30
जिलेटिन कार प्रकरणी प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविली का, याबद्दलची माहिती ‘एनआयए’ त्याच्याकडून घेणार असल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. वाझे ‘सीआययू’त नियुक्त होता.
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके असलेली कार ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझे हा प्रत्येक कामात थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्टिंग करत असल्याची माहिती ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना मिळाली. याचा तपास वाझेकडे देण्यात आला का? याबाबत लवकरच क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चाैकशी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. (A senior crime branch official on the NIA's radar)
जिलेटिन कार प्रकरणी प्रमुख तपास अधिकारी म्हणून वाझेला काेणी, कशासाठी नेमले, त्याबाबत योग्य प्रक्रिया राबविली का, याबद्दलची माहिती ‘एनआयए’ त्याच्याकडून घेणार असल्याचे समजते. येत्या एक-दोन दिवसांत त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. वाझे ‘सीआययू’त नियुक्त होता.
हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंतर्गत येतो. त्यामुळे वाझेचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, अपर आयुक्त वीरेश प्रभू व सहआयुक्त मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. साहजिकच त्यांना रिपोर्ट करणे वाझेला बंधनकारक होते. मात्र, वाझे थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होता. त्यामुळे स्फोटक कार प्रकरणात त्याच्याकडून अशाच पद्धतीने तपास करण्यात आला होता का, त्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे.