बस आणि दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 17:00 IST2019-03-05T16:59:53+5:302019-03-05T17:00:31+5:30
बस चालकाला अटक

बस आणि दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
मुंबई - आक्सा धारवली पुलाजवळ बस आणि बाईकच्या धडकेत एक महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. आज सकाळी हा अपघात घडला असून याप्रकरणी बेस्ट बस रूट क्रमांक २७२ च्या बस चालकाविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालकाला अटक त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांनी सांगितले. पोलीस याप्रकरणी अधीक चौकशी करत आहेत.
मृत महिलेचे नाव ममता निशाद परब (२१) असं आहे. मृत महिला विवाहित होती असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर अटक आरोपी बस चालकाचे नाव पोपट सावंत (५३) असं आहे.