जीन्स कारखान्यात कामगाराला विजेचा शॉक लागून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 20:11 IST2018-08-15T20:09:42+5:302018-08-15T20:11:09+5:30

Death in the jeans factory involves electric shock | जीन्स कारखान्यात कामगाराला विजेचा शॉक लागून मृत्यू 

जीन्स कारखान्यात कामगाराला विजेचा शॉक लागून मृत्यू 

उल्हासनगर -  कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५  येथील एका जीन्स कारखान्यात राकेश सरोज हा शिलाई मशीनवर काम करीत होता. त्यावेळी त्याला जोरदार विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जीन्स कारखान्यात सुरक्षा व्यवस्था नसल्याने राकेशचा मृत्यू झाल्याचाआरोप नातेवाईकांनी केला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी तो मध्यप्रदेशातून उल्हासनगरात आला होता असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Death in the jeans factory involves electric shock