कसारा घाटात सापडला अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 19:48 IST2018-07-23T19:47:21+5:302018-07-23T19:48:46+5:30
25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह

कसारा घाटात सापडला अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
cठाणे - कसारा पोलीस ठाणे हद्दीतील जुन्या कसारा घाटात एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह काल आढळून आला असून तिच्या अंगावर काळपट रंगाचा टॉप व क्रीम कलरची लेगीन असून त्यावर पांढऱ्या रंगाची फुलांची डिझाईन आहे. तसेच गळ्यात काळा धागा असून त्यात पिवळ्या धातूचे गणपतीचे पेंडल आहे. साधारण पंधरा दिवसापूर्वीचा मृतदेह असून उंची 5 फूट व मध्यम बांधा आहे. मृतदेहाचे आसपास ओळखीची कोणतीही वस्तू सापडली नाही. मृतदेहाची ओळख पटली असल्यास कसारा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांना 9767922966, 7021628478 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. कसारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.