दत्तवाडी पोलिसांनी जप्त केले पिस्तूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 15:36 IST2018-08-26T15:36:12+5:302018-08-26T15:36:56+5:30

अवैद्यरित्या शस्त्रबाळगल्याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली अाहे.

Dattawadi police seized pistols | दत्तवाडी पोलिसांनी जप्त केले पिस्तूल

दत्तवाडी पोलिसांनी जप्त केले पिस्तूल

पुणे : पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालीत असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन दत्तवाडी पोलिसांनी एकाकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई म्हसोबा चौकाजवळील गणपती मंदिराजवळ करण्यात आली. 

    संतोष राजू शेंडगे (वय 29, रा. घर क्रमांक 424, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी गणेशोत्सव, दहिहंडी सणांनिमित्त गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त सुरु होती. गस्त घालीत असताना पोलीस नाईक सुधीर घोटकुले व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबऱ्यामार्फत शेंडगे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाचे उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, रोहन खैरे, गाढवे, सागर सुतकर यांनी म्हसोबा चौकात सापळा लावला. 

    गणपती मंदिराजवळ आरोपी शेंडगे हा संशयास्पद अस्वथेत उभा असलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाव पत्ता सांगितला. त्याच्या अंगझडतीमध्ये 25 हजारांचे बेकायदा पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजार 200 रुपयांची अग्निशस्त्रे मिळून आली. शेंडगे हा रिक्षाचालक आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक सोमेश्वर यादव करीत आहेत. 

Web Title: Dattawadi police seized pistols