खतरनाक! पोलीस करत होते पाठलाग; कारमधून पाळणाऱ्या आरोपीने गुप्तांग घेतले कापून अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:16 IST2021-08-31T15:07:20+5:302021-08-31T15:16:30+5:30
Criminal cuts his private part : हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला जेव्हा स्थानिक पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते.

खतरनाक! पोलीस करत होते पाठलाग; कारमधून पाळणाऱ्या आरोपीने गुप्तांग घेतले कापून अन्...
वॉशिंग्टन - गुन्हेगाराचा पाठलाग करतानाची चित्रं तुम्ही पाहिली असतील. मात्र, असे होऊ शकते का की पोलिसांच्या पाठलागावर एखादी व्यक्ती त्याचे गुप्तांग कापून फेकून देते? वास्तविक ही काल्पनिक नाही तर हे एक सत्य आहे. असाच एक प्रकार अमेरिकेतील टेनेसी येथे उघडकीस आला आहे, जिथे पोलिसांनी एका संशयित आरोपीच्या कारचा पाठलाग केला, त्याने चाकूने त्याचे गुप्तांग कापले आणि नंतर कारच्या बाहेर फेकून दिला.
मात्र, हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला जेव्हा स्थानिक पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी बाहेर पडले होते. आरोपी देखील कारमध्ये होता, त्याने अचानक त्याच्या मागे अनेक पोलीस वाहने येताना पाहिली, नंतर हूटर्स आणि सायरन ऐकल्यावर त्याला काय वाटले ते समजले नाही आणि त्याने हे विचित्र कृत्य केले. 'न्यूजवीक'च्या एका बातमीचा हवाला देत दैनिक हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव टायसन गिल्बर्ट आहे. टेनेसी राज्याच्या डॉवेलटाऊन पोलिसांनी शरण येण्यास सांगितले. तेव्हा तो त्याच्याजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये बसून पळून गेला. त्यानंतर पोलिसांची मोठी टीम त्याचा पाठलाग करत होती.
पोलीस आश्चर्यचकित झाले
टायसनने हे केले तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. खरं तर, जेव्हा टायसनने त्याच्या गुप्तांगमधून खूप रक्तस्त्राव सुरू झाला, तेव्हा उपचाराच्या नावावर मदत घेताना आपली कार थांबवली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा टायसन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.