लॉकडाऊनमध्ये सायबर सेलने दाखल केले २५८ गुन्हे, आतापर्यंत ५७ आरोपींना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:35 PM2020-04-22T18:35:13+5:302020-04-22T18:37:38+5:30

ठाणे ग्रामीण व गोंदिया नवीन गुन्हे

Cyber cell files 258 cases in lockdown, arrests 57 accused so far in maharashtra pda | लॉकडाऊनमध्ये सायबर सेलने दाखल केले २५८ गुन्हे, आतापर्यंत ५७ आरोपींना अटक  

लॉकडाऊनमध्ये सायबर सेलने दाखल केले २५८ गुन्हे, आतापर्यंत ५७ आरोपींना अटक  

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या २५८गुन्ह्यांची  नोंद झाली आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
       

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या २५८गुन्ह्यांची  नोंद झाली आहे. त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत. यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, लातूर ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण ६, गोंदिया ५,हिंगोली ५,नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४,  सोलापूर शहर ३, रायगड २, धुळे २, वाशिम १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

     

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले, तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर प्रकरणी ६ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ५७ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .


          ठाणे ग्रामीण
ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत उत्तन सागरी पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने एका कोरोना बाधित व्यक्तीस quarantine करण्यासाठी ऍम्ब्युलन्समधून घेऊन जात असतानाचा विडिओ बनवून ,सदर विडिओ चुकीच्या  माहिती सोबत व्हाट्सअँपद्वारे प्रसारित करून, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला .
 

          गोंदिया
गोंदिया  तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे आता जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील दुकाने चालू असण्याच्या वेळेबाबत खोटी माहिती पसरवून संबधीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत अशा आशयाची पोस्ट्स व्हाट्सअँपद्वारे पसरविली होती .
 

   पालकांना विनंती
 सर्व नागरिकांना आणि विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते कि, आपले पाल्य ऑनलाईन surfing करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे . जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची  माहिती करून घ्या ,तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत,किंवा  काय वेबसाईट browse करत आहेत यावर लक्ष ठेवा .तसेच स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे . आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे ,तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा . जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले कि आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन fraud किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर  द्यावी. 

Web Title: Cyber cell files 258 cases in lockdown, arrests 57 accused so far in maharashtra pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.