शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पुण्यातील कंपनीवर सायबर हल्ला, सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलत कामकाज पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 10:21 PM

Cyber attack on a company : हॅकरने पुण्यातील प्रथितयश कंपनीवर सायबर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश करून कामकाजाचा पासवर्ड बदलला. परिणामी कंपनीचे कामकाज बंद पडले.

पिंपरी - हॅकरने पुण्यातील प्रथितयश कंपनीवर सायबर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश करून कामकाजाचा पासवर्ड बदलला. परिणामी कंपनीचे कामकाज बंद पडले. बाणेर येथील किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या यमुना बिल्डिंग मधील कार्यालयात ही घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीतील माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील अंबादास खानझोडे (रा. विजयानगर कॉलनी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.ही घटना १८ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटं ते ९ वाजून २१ मिनिटं दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सहा मे रोजी तक्रार दाखल केली आहे. हॅकरने पब्लिक आयपी अड्रेसचा वापर करीत कंपनीच्या व्हीपीएन युझरचा वापर करून संगणकीय प्रणालीत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीच्या नेटवर्क स्विचपोर्ट मधील सुपर ऍडमिनच्या खात्यात प्रवेश केला. नेटवर्क स्विच पोर्टमध्ये जाऊन ते बंद केले. त्याच बरोबर कंपनीच्या सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलला. त्यामुळे कंपनीच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील कामकाज बंद पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम