क्रूरता! सासूने सुनेच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नववधू राहत होती माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 21:27 IST2022-02-25T21:25:52+5:302022-02-25T21:27:03+5:30

Crime News : याप्रकरणी दोन महिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Cruelty! The mother-in-law put chilli powder in the private part of the bride, the bride was living in father's home | क्रूरता! सासूने सुनेच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नववधू राहत होती माहेरी

क्रूरता! सासूने सुनेच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नववधू राहत होती माहेरी

बाडमेर : राजस्थानातील बाडमेरमधील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला परस्पर वादानंतर सुनेच्या गुप्तांगामध्ये मिरचीसारखी वस्तू टाकत आहेत. हे धक्कादायक प्रकरण राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोन महिलांनाही पोलिसांनीअटक केली आहे.

सासूचे सुनेशी भांडण
बाडमेर जिल्ह्यातील सिणधरी पोलीस स्टेशन परिसरात एक सासू आपल्या सुनेला घेण्यासाठी तिच्या मुलाच्या सासरच्या घरी गेली होती. सून निघून गेल्यावर सासरच्यांशी काही वादातून भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि काही महिलांनी मिळून सुनेच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकली.

या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवला होता
सुनेने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण दोन महिलांनी तिला पकडले आणि खूप शिवीगाळ केली. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. ही घटना आठवडाभरापूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे, मात्र नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

पोलिसांनी दोन महिलांना अटक केली
हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांना अटक केली. पोलिसांनी पीडितेचे मेडिकलही केले आहे. पोलीस व्हिडीओ बनवणाऱ्याचा शोध घेत असून हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे त्याचा हेतू काय होता याचा शोध घेत आहेत. हा काही षड्यंत्राचा भाग आहे का? याची चौकशी केली जाईल. 

Web Title: Cruelty! The mother-in-law put chilli powder in the private part of the bride, the bride was living in father's home