Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 21:55 IST2022-07-26T21:55:13+5:302022-07-26T21:55:46+5:30

Woman assaulted sexually : पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत ती तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.

Crime News : Woman assaulted by threatening to make the photo viral | Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Crime News : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

नांदुरा (बुलडाणा) : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील एका गावातील आरोपी करण सुनील वाघ (२४) याच्याविरुद्ध नांदुरा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.            

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत ती तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तेथील आरोपी करण सुनील वाघ (२४) याने १३ मे २०२१ ते ११ जून २०२२ दरम्यान पीडित महिलेच्या घरी येऊन तिच्यासोबत फोटो काढले. तिच्यावर अत्याचार केला. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला. तसेच फोटो डिलीट करण्यासाठी आरोपीने पीडितेला तिच्या आईच्या मोबाइलवर फोन करून मलकापूर येथे बोलावले. मलकापूर शहरातील आर्य निवास लॉजमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपी करण सुनील वाघ याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: Crime News : Woman assaulted by threatening to make the photo viral