Crime News: पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाचा पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:15 IST2022-03-17T13:14:54+5:302022-03-17T13:15:27+5:30
Crime News: एका टॅक्सी चालकाला गावातील एक गुंड आणि पोलीस अधिकारी त्रास द्यायचे, त्याच्याकडून हफ्ता वसुली करायचे. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Crime News: पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाचा पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
लखनौ: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बुधवारी रात्री उशिरा एका तरुणाने पोलिस स्टेशनच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले. स्थानिक एसएचओ, स्टेशन प्रभारी आणि गावातील गुंडांच्या जाचाला कंटाळून तरुणाने हे टाकेचा पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. शिवम गुप्ता असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तो लखनौमध्ये टॅक्सी चालक आहे.
स्वतःला आग लावून घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत शिवम गुप्ताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडियाला दिलेल्या निवेदनात पीडित तरुणाने म्हटले आहे की, गावातील एक गुंडाने अनेकदा त्याची टॅक्सी जप्त करुन पैसे उकळले होते. याविरोधात शिवमने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यालाही माहिती दिली. पण, तो गुंड पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुनच असे करत असल्याचे उघड झाले. या सर्व त्रासाला कंटाळून शिवमने हे टोकाचे पाऊळ उचलले.
शिवमने सांगितल्यानुसार, तो गुंड अनेकदा त्याची टॅक्सी अडवायचा, त्याला मारहाणही करायचा. पोलीस अधिकारी महिन्याला त्याच्याकडून 2,500 रुपये हप्था घेत होते. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोरच आग लावण्याच्या या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित शिवम गुप्ता याने केलेल्या आरोपाच्या चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले असून त्या भागाच्या स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे.