Crime News: प्रेमीयुगुलाचा खून... तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा आवळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 11:18 IST2022-08-13T11:17:15+5:302022-08-13T11:18:24+5:30
राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.

Crime News: प्रेमीयुगुलाचा खून... तरुणीच्या भावाने युवकाला घातल्या गोळ्या, बहिणीचा गळा आवळला
चोपडा जि. जळगाव : प्रेमीयुगुलापैकी तरुणाचा गोळ्या घालून तर तरुणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना घटना चोपडा येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजता उघडकीस आली. खून केल्यानंतर तरुणीचा भाऊ स्वतःच पोलिसात हजर झाला. या घटनेने चोपडा तालुका हादरला आहे.
राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) आणि वर्षा समाधान कोळी( २०,रा.सुंदरगढी चोपडा) असे या खून झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.
वर्षा हिस पळवून नेण्याच्या उद्देशाने राकेश हा शुक्रवारी रात्री तिच्या घरी आला होता. त्यास चार आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि शहरानजीक नाल्याजवळ नेले. तिथे त्याचा कपाळात गावठी कट्ट्याने गोळ्या घालून तर बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला.
या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी पोलीस ठाण्यात आला आणि घडलेली घटना सांगितली. तुषार कोळी (रा. माचला ता. चोपडा), भरत संजय रायसिंग (रा. चोपडा), निलेश कोळी अशी इतर आरोपींची नावे आहेत.