शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Shraddha Murder Case: आफताबच्या चौकशीत मोठा खुलासा, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर चेहरा जाळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:29 IST

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की आफताबची चौकशी सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव जाणवत नव्हता...

मुंबईतीलश्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब अमीन पुनावालाने (Aftab Amin Poonawalla) श्रद्धाच्या हत्येनंतर, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर मृदेहाची ओळख पटू नये, म्हणून तिचा चेहराही जाळला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे.

ओळख लपवण्यासाठी अफताबने जाळला चेहरा -श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताब अमीन पुनावालाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर, डोके फेकण्यापूर्वी, ओळख लपवण्यासाठी आपण तिचा चेहरा जाळला होता, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) चोकशीत, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर, सर्वप्रथम, जे तुकडे खराब होऊ शकतात, असे तुकडे फेकल्याचा खुलासाही झाला आहे. 

यासंदर्भात बोलताना आफताबची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी लोबताना सांगितले, की आरोपी आफताबने पुरावे नष्ट करण्यासाठी आणि फरशीवर रक्ताचा एकही डाग दुसू नये म्हणून ब्लीच आणि केमिकलचा वापर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताबने चौकशी दरम्यान सांगितले, की त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर, तीच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. यानंतर त्याने तीच्या शरिराचे सर्व अवयव जंगलात फेकून दिले आणि अंगठा दुसऱ्या ठिकाणी  फेकला. 

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे, की आफताबची चौकशी सुरू असताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव जाणवत नव्हता. पोलिस अधिकारी त्याच्यासोबत जेव्हा हिंदीत बोलतात तेव्हा तो इंग्रजित उत्तर देतो. तो पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये रात्री आरामात झोपतो. हत्येनंतर, आरोपी आफताबचे मित्रही त्याच्या घरी आले होते. मात्र, त्यावेळी त्याने ते पार्ट दुसऱ्या ठिकाणी लपवले होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरMumbaiमुंबईPoliceपोलिस