Crime News: धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये तरुणींकडून मारहाण, पैसे काढून घेतले, तरुणाने विषप्राशन करून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:23 PM2022-02-24T14:23:35+5:302022-02-24T14:24:16+5:30

Crime News:तरुणींनी केलेल्या मारहाणीमुळे धक्का बसलेल्या एका तरुणाने संशयास्पद परिस्थितीमध्ये विषप्राशन करून आतमहत्या केली. दरम्यान, या प्रकरणात स्पा सेंटरमधील मुलींविरोधात आरोप केला आहे.

Crime News: Shocking! Young man beaten, robbed of money in spa center, young man commits suicide by poisoning | Crime News: धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये तरुणींकडून मारहाण, पैसे काढून घेतले, तरुणाने विषप्राशन करून केली आत्महत्या 

Crime News: धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये तरुणींकडून मारहाण, पैसे काढून घेतले, तरुणाने विषप्राशन करून केली आत्महत्या 

Next

 करनाल (हरियाणा) -  तरुणींनी केलेल्या मारहाणीमुळे धक्का बसलेल्या एका तरुणाने संशयास्पद परिस्थितीमध्ये विषप्राशन करून आतमहत्या केली. दरम्यान, या प्रकरणात स्पा सेंटरमधील मुलींविरोधात आरोप केला आहे, पीडिताच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, त्यांचा मुलगा ज्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्यांचे के३सी मॉलमध्ये गोडाऊन आहे. तिथे तो गोडाऊनमध्ये सामान ठेवण्यासाठी गेला होता. त्या मॉलमध्ये स्पा सेंटर आहे जिथे अनेक गैरधंदे चालतात.

स्पा सेंटरमध्ये काही घटना घडली, त्यानंतर तिथे असलेल्या १२ मुलींनी या तरुणाला मारहाण केली. या तरुणाकडून पैसेही हिसकावून घेण्यात आले असा आरोप या तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. सेक्टर १२ मधील सुपर मॉल एरियामध्ये ज्या तरुणींनी  मारहाण केली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाईचे आश्वासन  दिले आहे.

सेक्टर १२ मध्ये दो ठिकाणी स्पा सेंटर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रामनगरमधील रहिवासी असलेली अमन तिथे आला होता. त्याला १०-१२ तरुणींनी मारहाण केली. दरम्यान, त्याच्याकडील १२ हजार रुपये हिसकावून घेण्यात आल्याचा, तसेच ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप अमनने केला होता. त्यानंतर अमनने घरी जाऊन आत्महत्या केली होती. याबाबत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप कुमार यांनी सांगितले की, पीडितांकडून तरुणींवर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी केली जाईल. 

Web Title: Crime News: Shocking! Young man beaten, robbed of money in spa center, young man commits suicide by poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.