विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 12:25 PM2021-07-10T12:25:25+5:302021-07-10T12:27:54+5:30

Crime News : पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News rajasthan 19 year old girl gangraped in alwar | विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्...

विकृतीचा कळस! तरुणीचं अपहरण करून 7 जणांनी केला सामूहिक बलात्कार, नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं अन्...

Next

नवी दिल्ली - राजस्थानच्या अलवरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर सात लोकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भयंकर बाब म्हणजे नराधमांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि ते फरार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मुलीच्या भावाने 5 जुलै रोजी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. 4 जुलैच्या रात्री साधारण 11.30 वाजता तिची बहीण घराबाहेर गाय बांधण्यासाठी गेली होती. तेथे अली मोहम्मद, सद्दाम आणि साजिद बसून दारू पित होते. यादरम्यान या तिघांनी मुलीचं तोंड दाबून तिला पळवून नेलं. सुरुवातील तिला ताहिरच्या घरी नेण्यात आलं. तेथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिघांनी पीडितेला गाडीत टाकून सांखला गावी घेऊन गेले. तेथे ताहिरचे मित्र उमरदीन आणि मरमेज या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. 

आरोपी त्यानंतर 19 वर्षांच्या पीडितेला दिवाकरी गावात घेऊन गेले. येथे कुम्हार आणि अरबान यांनीही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रात्री उशिरा पीडितेला त्यांनी विट भट्टीजवळ सोडून पळ काढला. घरी परतल्यानंतर पीडितेने कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तरुणीचं अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

चेटकीण असल्याच्या संशयातून एका महिलेची हत्या करण्याची आल्याची भयंकर घटना घडली आहे. 6 वर्षीय लेकाने आपल्या आईसोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितल्याने ही घटना उघडकीस आली आहे. झारखंडच्या पलामू-विश्रामपूरमध्ये एका महिलेची मान कापून हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या सहा वर्षीय मुलाने आपल्या आईसोबत काय झालं याची माहिती पोलिसांना दिली आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण अचानक घरात घुसले. त्यांनी आईला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर तिची मान कापली. चिमुकल्याने आरोपींमध्ये आपल्या सख्ख्या काकाचं देखील नाव घेतलं आहे. एक महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून महिलेवर संशय घेतला जात होता. महिलेला काही लोकांनी धमकी देखील दिली होती. 

Web Title: Crime News rajasthan 19 year old girl gangraped in alwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.