संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:17 IST2025-11-28T13:15:19+5:302025-11-28T13:17:30+5:30
दिल्लीतील एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली. तिचा मृतदेह बागपतमधील जंगलात फेकून दिला. दोघांनी एप्रिलमध्ये कोर्ट मॅरेज केले होते.

संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
एका तरुणाचे आणि तरुणीचे प्रेम प्रकरण सुरू झालं. यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. पण, नंतर २२० दिवसांनी तरुणाने तरुणीची हत्या केली, ही घटना दिल्लीतील आहे. तयब्बा नावाच्या तरुणीला प्रेम प्रकरणात आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना तय्यबाचा मृतदेह जंगलात सापडला. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी या वर्षी १५ एप्रिल रोजी साकेत कोर्टात लग्न केले होते, तय्यबाचा प्रियकरानेच हत्या केली. दरम्यान, आरोपी फैसलने करकरडूमा कोर्टात आत्मसमर्पण केले आहे.
फैसल आणि तय्यबा यांनी १५ एप्रिल रोजी साकेत कोर्टात त्यांच्या कुटुंबियांपासून गुप्तपणे लग्न केले. लग्नानंतरही, तय्यबा चांद बाग परिसरातील तिच्या माहेरी घरी राहत होती आणि फैसलवर तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणत होती. फैसल आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याचे कुटुंब मुस्तफाबादमध्ये राहते आणि त्याचे वडील आलम हे प्रॉपर्टी डीलर आहेत.
तय्यबाची गोळी घालून हत्या
ती सोबत राहण्यासाठी दबाव आणत होती, फैसलला त्याचे दुसरे लग्न आणि नाते गुप्त ठेवायचे होते. तय्यबाने त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह धरला. यावेळी त्यांच्यात वाद वाढले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वादामुळे संतप्त झालेल्या फैसलने २२ नोव्हेंबर रोजी काही तरी बहाण्याने तय्यबाला आमिष दाखवून तिच्या गाडीत घेऊन गेला. वाटेत जोरदार वाद झाला, त्यानंतर फैसलने तिची गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर, त्याने त्याच्या मित्राच्या गाडीचा वापर करून मृतदेह बागपत जंगलात टाकला.