माणुसकीला काळीमा! औरंगाबाद हादरलं; अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 17:11 IST2022-08-15T16:56:07+5:302022-08-15T17:11:24+5:30
Crime News : खेडा आठेगाव येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

माणुसकीला काळीमा! औरंगाबाद हादरलं; अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी केला बलात्कार
कन्नड - स्वातंत्र्य मिळाल्याचे अमृत महोत्सवी वर्ष देश साजरे करत असताना दुसरीकडे मानव जातीला काळीमा फासणारी घटना तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील खेडा आठेगाव येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील खेडा आठेगाव येथे पीडिता ही शिक्षण सोडून देऊन पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या आई बरोबर मोल मजुरीसाठी जात होती. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले 13 ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडितेच्या राहत्या घरी किरण साहेबराव गोंडे व अरुण कैलास दरेकर या दोघांनी पीडीतेवर जबरदस्ती केली. याअगोदर किरण साहेबराव गोंडे (३२), अरुण कैलास दरेकर (३१), श्रीकांत अशोक जाधव (३३), गोविंद नेमीनाथ शेळके(२९), संकेत जगन जाधव (१९) व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक हे सतत तीची छेड कडून तिच्यावर वारंवार बलात्कार करीत होते.
पीडितेने शनिवारी घडलेली घटना आपल्या आईच्या कानी घातली. पीडितेच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार तात्काळ ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष क लवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी आर भालेराव,फौजदार एस एस राजपूत, राम बारहाते, ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पिंक मोबाईल पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. वरील सर्व आरोपींना अटक केली यात एक जण अल्पवयीन आरोपी आहे. न्यायालयाने ५ आरोपींना १७ ऑगस्ट बुधवारपर्यंत पोलीस कोठडी दिली असून एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहात रवानगी केली. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव करीत आहेत.