शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 23:06 IST

आईला छतावरून फेकल्याचे पाहून मुलांनी तात्काळ आपल्या आजोबांना माहिती दिली. यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

काही दिवसांपूर्वी बरेली जिल्ह्यात पतीने आपल्या पत्नीला छतावरून फेकल्याची घटना घडली होती. तसाच एक धक्कादायक प्रकार आता उरईमधून समोर आला आहे. येथे एका पतीने हुंड्यासाठी क्रूरतेची परिसीमा गाठली. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने तो आपल्या पत्नीला छळू लागला. विशेष म्हणजे, संबंधित महिलेचे हे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या पतीपासून मुलेही होती. एका दिवशी पतीने आधी मुलांना घरातून हाकलून दिले, त्यानंतर पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिला छतावरून खाली फेकून दिले.

आईला छतावरून फेकल्याचे पाहून मुलांनी तात्काळ आपल्या आजोबांना माहिती दिली. यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हुंड्यासाठी आमनाचा छळशहरानजिकच्या श्याम नगर मोहल्ल्यात राहणाऱ्या कमर सिद्दीकी यांनी उरई कोतवालीमध्ये तक्रार दाखल करत सांगितले की, त्यांची मुलगी आमना हिचा निकाह चार वर्षांपूर्वी आरिफसोबत झाला होता. आमनाचे हे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत. निकाहपूर्वी, तिचा दुसरा पती आरिफ (रा. मोहल्ला टिळक नगर) याने मुलांची काळजी घेण्याचे वचन दिले होते. मात्र, लग्नानंतर त्याने दोन मुलांना घरातून बाहेर काढल. तसेच, तो आमनाला मारहाण करू लागला.

मुलांनी आईला पडताना पाहिलं अन्... 

१९ जून रोजी सायंकाळी पती आरिफ, त्याचा भाऊ इम्रान उर्फ ​​लालू, बहीण शहनाज आणि मुलगी निदा यांनी आमनाला मारहाण केली. त्यांनी तिचे सोन्याचे कानातलेही हिसकावून घेतले. यानंतर त्यांनी आमनाला छतावरून खाली फेकून दिले. ती खाली उभ्या असलेल्या मोटरसायकलवर पडली आणि गंभीर जखमी झाली. ही घटना पाहून आमनाच्या मुलाने धावत जाऊन आपल्या आजोबांना कळवले. वडिलांनी लगेच मुलीला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या आधारेही पोलीस पुरावे गोळा करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश