आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:44 IST2025-08-12T18:43:24+5:302025-08-12T18:44:29+5:30
Crime News : जून २०२५ मध्ये ही महिला गर्भवती राहिली, पण जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.

आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
Crime News : गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाला आहे. वडोदरा येथे एका ४० वर्षीय महिलेवर सासऱ्याने आणि मेहुण्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. या घटनेमागे तिच्याच पतीचा हात असल्याचे समोर आले आहे. पती आरोग्याच्या समस्येमुळे वडील होऊ शकत नव्हता, यामुळे त्या पतीने आपल्याच पत्नीला ब्लॅकमेल करुन सारसऱ्यासोबत संबंध ठेवायला लावल्याचे आरोप महिलेने केले आहेत. या प्रकरणी महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नानंतर काही आठवड्यांनी सासरच्यांनी प्रेगन्सीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात पतीच्या शुक्राणूंची संख्या खूप कमी असल्याचे सांगितले, त्यानंतर महिलेने मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला, पण सासरच्यांनी तो सल्ला नाकारला. यानंतर, सासरच्यांनी अत्याचार करण्यास सुरुवात केली.
महिलेला नग्न फोटो दाखवून ब्लॅकमेल केले
जुलै २०२४ मध्ये एका रात्री, ज्यावेळी ती महिला तिच्या खोलीत झोपली होती, त्यावेळी तिचा सासरा खोलीमध्ये आला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. पीडितेने विरोध केला तेव्हा त्याने पीडितेला मारहाण केली. महिलेने तिच्या पतीला सांगितले तेव्हा त्याने दुर्लक्ष केले. पतीने सांगितले की मुल हवे आहे, यावेळी पतीने महिलेला गप्प राहण्याची धमकी दिली. तसेच, पतीने तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या सासऱ्यांनी अनेक वेळा बलात्कार करूनही ती महिला गर्भवती राहिली नाही. डिसेंबर २०२४ मध्ये, तिच्या मेहुणीच्या नवऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला . महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचली होती, परंतु भीती आणि धमक्यांमुळे ती गप्प राहिली.
पोलिसांत गुन्हा दाखल केला
जून २०२५ मध्ये ही महिला गर्भवती राहिली, पण जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने धाडस केले आणि पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासानंतर नवापुरा पोलिसांनी सासरा आणि मेहुणीच्या पतीविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पतीवर ब्लॅकमेलिंग आणि धमकी दिल्याचाही आरोप आहे.