जन्मदाताच झाला हैवान! 7 वर्षांच्या लेकाला पाण्याच्या टाकीत फेकून, दगड मारून बापाने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:24 PM2021-06-17T16:24:50+5:302021-06-17T16:29:46+5:30

Crime News : एका जन्मदात्यानेच आपल्या लेकाचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Crime News father killed seven year old son police arrested bikaner rajasthan | जन्मदाताच झाला हैवान! 7 वर्षांच्या लेकाला पाण्याच्या टाकीत फेकून, दगड मारून बापाने घेतला जीव

जन्मदाताच झाला हैवान! 7 वर्षांच्या लेकाला पाण्याच्या टाकीत फेकून, दगड मारून बापाने घेतला जीव

Next

नवी दिल्ली - देशात अनेक भयंकर घटना घडत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जन्मदात्यानेच आपल्या लेकाचा जीव घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पित्याने आपल्या सात वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टाकीत फेकून दिलं आणि त्याला दगडही मारले. मुलाने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड केली, टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला असता आरोपी वडिलांनी टाकीचं झाकण लावून घेतलं. यामुळेच मुलाच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये ही घटना घडली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूलाराम असं आरोपीचं नाव असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच मुलाचा मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी देखील पाठवण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गावकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मूलारामची काही वर्षांपासून मानसिक अवस्था ठीक नाही. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा पाय तोडला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला तलाक दिला. मूलारामला दोन मुलं होती. 


 
तलाकनंतर पत्नीने एका मुलाला आपल्यासोबत नेलं आणि दुसरा मुलगा मूलारामसोबत घरीच राहत होता. मूलाराम काहीच कामधंदा करत नव्हता. त्याने याआधी स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे, तसेच मूलारामची कसून चौकशी करण्यात येत आहे. टाकीमध्ये जवळपास सहा ते सात फूट पाणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

खळबळजनक! रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कोरोनाग्रस्ताची केली हत्या; चौकशीतून समोर आलं धक्कादायक कारण

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने कोरोनाग्रस्त रुग्णाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चौकशीतून धक्कादायक कारण समोर आलं आहे. तामिळनाडूमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. एका सरकारी रुग्णालयात कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने एका कोरोना रुग्णाची गळा दाबून हत्या केली आहे. आपल्या पैशाची आणि मोबाईलची गरज असल्याने हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती तिने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला 23 मे रोजी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आठ जूनला त्याचा मृतदेह आढळला. 

Web Title: Crime News father killed seven year old son police arrested bikaner rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app