धक्कादायक! लग्नानंतरही गर्लफ्रेंडने दिला त्रास म्हणून 'त्याने' तिच्याच घरात घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 06:46 PM2021-09-25T18:46:13+5:302021-09-25T18:49:04+5:30

Crime News : गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना घडली आहे.

Crime News distressed the lover hanged himself after coming to the girlfriend house baran | धक्कादायक! लग्नानंतरही गर्लफ्रेंडने दिला त्रास म्हणून 'त्याने' तिच्याच घरात घेतला गळफास

धक्कादायक! लग्नानंतरही गर्लफ्रेंडने दिला त्रास म्हणून 'त्याने' तिच्याच घरात घेतला गळफास

Next

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लग्नानंतरही गर्लफ्रेंडने त्रास दिला म्हणून तरुणाने तिच्याच घरात गळफास घेतला आहे. राजस्थानच्या बारां शहरात पाच दिवसांपूर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आता त्याच्या गर्लफ्रेंडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. राजकुमार असं या तरुणाचं नाव असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलीस अधिकारी मांगेलाल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी मोतीलाल कुम्हार यांनी तक्रार केली होती. त्यांनी आपला मुलगा राजकुमार यांना 20 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री दोन वाजता एक तरुणी घरी आली आणि राजकुमारचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राजकुमारचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 

तरुणीला राजकुमारसोबत लग्न करायचं होतं. पण त्याने जवळपास पाच महिन्यांपूर्वीच एका दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. यामुळे तरुणी नाराज झाली होती. याच कारणामुळे या दोघांमध्ये सतत भांडण व्हायची. 20 तारखेला देखील त्यांच्यात मोठा वाद झाला. यातूनच गर्लफ्रेंडला वैतागून राजकुमारने तिच्याच घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात राजकुमार आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं सतत भांडण होत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साधुकडून चौतरवा पोलीस ठाणे हद्दीतील मठिया सरेह या भागात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने याचा विरोध केला असता आरोपीने तिची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला आहे. कुऱ्हाडीने वार करून आरोपीने महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे. साधू हा महिलेच्या शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. 

English summary :
Crime News distressed the lover hanged himself after coming to the girlfriend house baran

Web Title: Crime News distressed the lover hanged himself after coming to the girlfriend house baran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app