माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:10 PM2021-09-24T16:10:29+5:302021-09-24T16:23:49+5:30

Crime News : धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला आहे. कुऱ्हाडीने वार करून आरोपीने महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे.

Crime News bihar man tries to rape women killed her with an axe | माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या

माणुसकीला काळीमा! साधुने महिलेवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच केली निर्घृण हत्या

Next

नवी दिल्ली - बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साधुकडून चौतरवा पोलीस ठाणे हद्दीतील मठिया सरेह या भागात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने याचा विरोध केला असता आरोपीने तिची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला आहे. कुऱ्हाडीने वार करून आरोपीने महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं आहे. साधू हा महिलेच्या शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. 

या घटनेबाबत माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूर निवासी असलेल्या तारा देवी गुरुवारी सकाळी आपल्या मुलीसह गवत कापत होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणारा मोतीलाल यादव तेथे पोहोचला आणि महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा महिला आरडाओरडा करू लागली तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला व फरार झाला. 

महिलेच्या कुटुंबीयांनी साधुविरोधात तक्रार केली दाखल

आरोपीने महिलेवर हल्ला केला तेव्हा तो साधुच्या वेशात होता. महिलेच्या मुलीसमोर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार अत्यंत भयंकर असून महिलेचं डोकं तिच्या धडापासून वेगळं होईपर्यंत तिच्या मानेवर वार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी साधुविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ; सुसाईड नोटमध्ये म्हटलं...

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं आहे. मुलीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Web Title: Crime News bihar man tries to rape women killed her with an axe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app