8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, शरीराचे लचके तोडले...; आरोपी निघाला HIV पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:58 IST2022-06-21T20:57:17+5:302022-06-21T20:58:07+5:30
आरोपीविरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे...

8 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, शरीराचे लचके तोडले...; आरोपी निघाला HIV पॉझिटिव्ह
राजधानी दिल्लीतील बदरपूर भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी HIV पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात माहिती मिळताच संबंधित पीडित मुलीचीही टेस्ट करण्यात आली. सुदैवाने पीडित चिमुकलीची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, पुन्हा एकदा मुलीची टेस्ट करण्यात येणार आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवला होता. त्याने 15 जूनला संबंधित चिमुकलीवर बलात्कार केला होता.
आरोपीच्या कुटुंबात दोन पत्नी आणि पाच मुली आहेत. पोलीस त्यांचीही तपासणी करवत आहेत. पोलिसांनी आरोपी राहुलला पलवल येथून त्याच्या आत्याच्या घरून अटक केली. त्याच्या विरोधात POSCO अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
संबंधित आरोपीने मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले होते. एवढेच नाही, तर तिच्या शरीरावर 20 हून अधिक जखमा आढळून आल्या होत्या. अत्याचार झालेल्या चिमुकलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, तिला घरी पाठवण्यात आले होते. या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पीडित चिमुकलीही अत्यंत घाबरलेली आहे.