प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंजिनिअर झाला चोर; अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:07 PM2021-07-28T13:07:00+5:302021-07-28T13:12:49+5:30

Crime News : एका महिलेच्या कानातील दागिन्यावर त्याने डल्ला मारला होता. त्याने बाईकवरून महिलेच्या कानातील दागिने हिसकावले होते.

Crime News bses junior engineer become robber to celebrate girlfriend birthday | प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंजिनिअर झाला चोर; अशी झाली पोलखोल

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंजिनिअर झाला चोर; अशी झाली पोलखोल

googlenewsNext

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका इंजिनिअरने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. शाहदरा जिल्ह्यातील मानसरोवर पार्क परिसरात बीएसईएसच्या ज्युनियर इंजिनिअर आपल्या गर्लफ्रेंडसाठी चोर बनला आहे. इंजिनियरने चोरी केलेले दागिने विकून वाढदिवस साजरा केला. एका महिलेच्या कानातील दागिन्यावर त्याने डल्ला मारला होता. त्याने बाईकवरून महिलेच्या कानातील दागिने हिसकावले होते. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित गौतम असं या 31 वर्षीय आरोपीचं नाव असून तो ज्योती नगरचा रहिवासी आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. घरातील लोकांनी देखील त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. मानसरोवर पार्क पोलीस स्थानकामध्ये कानातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेने नोंदवली होती. बाईकवरुन आलेल्या एका व्यक्तीने आपल्या कानातील दागिने खेचून घटनास्थळावरुन पळ काढल्याचं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी 30 वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. या तपासामध्ये त्यांना बाईकस्वार चोर कोणत्या दिशेला पळून गेला हे समजलं. या व्हिडीओमधून पोलिसांनी काही स्क्रीनशॉर्ट्स काढले. ज्यामध्ये हा चोर तोंडावर मास्क घालून असल्याचं दिसून आलं. मात्र या बाईकवर कोणताही क्रमांक नसल्याने चोराचा शोध घेणं थोडं अवघड झालं होतं. पोलिसांनी या परिसरामध्ये आपला तपास सुरूच ठेवला. 

पोलिसांना एका दुकानासमोर सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसलेल्या बाईकसारखीच बाईक दिसली. पोलिसांना सापळा लावून या बाईकचा मालक असणाऱ्या गौतमला ताब्यात घेतलं. पोलीस तपासादरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता आणि तो साजरा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने मी चोरी केली असं गौतमने पोलिसांना सांगितलं. बीएसईएसमध्ये तो ज्यूनियर इंजिनियर पदावर कार्यरत असल्याचं देखील सांगितलं. गौतमने दिलेल्या माहितीनुसार त्याने हे दागिने सुरेंद्र नावाच्या ज्वेलर्सला विकले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News bses junior engineer become robber to celebrate girlfriend birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.