Crime News: अनैतिक संबंधांमुळे घराची बदनामी, कुटुंबात व्हायचे वाद, वैतागून छोट्या भावाने मोठ्या भावावर कुदळाने केले वार आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 19:42 IST2021-09-07T19:41:39+5:302021-09-07T19:42:14+5:30

Crime News: झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News: Brother killed his elder brother due to illicit relationship in Jharkhand | Crime News: अनैतिक संबंधांमुळे घराची बदनामी, कुटुंबात व्हायचे वाद, वैतागून छोट्या भावाने मोठ्या भावावर कुदळाने केले वार आणि...

Crime News: अनैतिक संबंधांमुळे घराची बदनामी, कुटुंबात व्हायचे वाद, वैतागून छोट्या भावाने मोठ्या भावावर कुदळाने केले वार आणि...

रांची - झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरसलोयामध्ये छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Crime News) मोठ्या भावाचे एका महिलेसोबत तीन अनैतिक संबंध होते. त्यामुळे कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बदनामीला सामोरे जावे लागत होते. तसेच घरातही भांडणे होत होती. खूप समजूत काढल्यानंतरही हा मोठा भाऊ सदर महिलेपासून दूर जात नव्हता. त्यामुळे वैतागून अखेर लहान भावाने मोठ्या भावाचा कुदळाने वार करून खून केला. आता पोलिसांनी आरोपी छोट्या भावाला अटक केली आहे. (Brother killed his elder brother due to illicit relationship in Jharkhand )

एसपी डॉ. शम्स तब्रेज यांनी सांगितले की, या हत्येचा तपास करत असताना संशयाची सुई मृताचा सख्या भाऊ असीम टोपनो याच्याकडे वळली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. या तरुणाचा मोठा भाऊ बरसलोया कुबीटोली येथे राहणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. या महिलेसोबत त्याचे तीन चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याबाबत गावामध्ये पंचायतही बसली होती. तसेच मृताला बरसलोया कुबीटोली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही तो तिथे जायचा त्यामुळे कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत होते.

आठवडाभरापूर्वी मृताचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती मुलांना सोडून रांचीला निघून गेली होती. तेव्हापासून आरोपीच मृताच्या मुलांचा सांभाळ करत होता. दरम्यान, मोठ्या भावाच्या वर्तनामुळे वैतागून अखेर त्याने बरसोया कुबीटोली येथे महिलेच्या घरी झोपलेल्या भावाची कुदळाने वार करून हत्या केली. दरम्यान आरोपीने दाखवल्यानुसार पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेला कुदळ जप्त केला आहे. तसेच आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. 

Web Title: Crime News: Brother killed his elder brother due to illicit relationship in Jharkhand