Crime News: बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर भाईंदरमध्ये अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:17 PM2022-01-19T23:17:59+5:302022-01-19T23:18:47+5:30

Crime News: वसई पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टर हेमंत पाटील वर भाईंदर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या २०२० सालच्या तक्रारी वरून अखेर गुन्हा दाखल केला आहे . पाटील हा कोरोना काळात मीरा भाईंदर महापालिकेच्या सेवेत देखील डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

Crime News: Bogus doctor Hemant Patil finally filed a case of molestation in Bhayander | Crime News: बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर भाईंदरमध्ये अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल  

Crime News: बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर भाईंदरमध्ये अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल  

Next

मीरारोड - वसई पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टर हेमंत पाटील वर भाईंदर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या २०२० सालच्या तक्रारी वरून अखेर गुन्हा दाखल केला आहे . पाटील हा कोरोना काळात मीरा भाईंदर महापालिकेच्या सेवेत देखील डॉक्टर म्हणून कार्यरत होता . त्या प्रकरणी पालिकेने देखील कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्यास घेतली आहे.

कोरोना संसर्गाच्या २०२० मधील पहिल्या लाटे वेळी मीरा भाईंदर महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या होत्या . त्याकाळात हेमंत पाटीलयाची देखील पालिकेने भीमसेन जोशी रुग्णालयात नियुक्ती केली होती . त्यावेळी पाटील याची एका समितीच्या महिला सदस्य सोबत ओळख झाली होती . तो त्या महिलेच्या एका खांद्याची शस्त्रक्रिया झाली असल्याने ती फाईल तिने दाखवली होती.

तो महिलेस कॉल करून व व्हॉट्सएप मॅसेज पाठवत होता . महिलेने भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सुद्धा दिला होता . परंतु तो तसाच प्रलंबित होता. आता मात्र हेमंत पाटील बोगस डॉक्टर निघाल्याने महिलेच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी रविवार १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.

त्यावेळी पोलिसात व पालिके कडे सातत्याने तक्रारी करून देखील दखल घेतली गेली नव्हती असे पिडीत महिलेने सांगितले . दुसरीकडे महापालिकेने देखील ह्या बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्या बाबत विचारविनिमय सुरु केले आहे . त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जात असून त्यावर अंतिम मंजुरी झाल्या नंतर कार्यवाही होणे अपेक्षित आहे .

Web Title: Crime News: Bogus doctor Hemant Patil finally filed a case of molestation in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.