धक्कादायक! भाजपा नेत्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 16:41 IST2021-10-25T16:40:34+5:302021-10-25T16:41:37+5:30
Crime News bjp leader commit suicide : भाजपा नेता अभिषेक शुक्ला याने सोमवारी सकाळी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

धक्कादायक! भाजपा नेत्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटने खळबळ
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका भाजपा नेत्याने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटने एकच खळबळ उडाली आहे. सुशांत गोल्फ सिटी परिसरात राहणारा भाजपा नेता अभिषेक शुक्ला याने सोमवारी सकाळी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पोलिसांना रुममध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली असून त्यामध्ये पत्नीसोबत वाद होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक रिलायन्समध्ये डीजीएम पदावर कार्यरत होता. पोलीस अधिकारी विजयेंद्र सिंह यांनी अभिषेक शुक्ला हा भाजपाचा नेता होता. सोमवारी सकाळी त्याने आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. मोठा आवाज आल्याने घरातील इतर सदस्य त्याच्या रुममध्ये आले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला असं सांगितलं आहे. त्यानंतर अभिषेक यांच्या काही मित्रांनी पोलीस कंट्रोल रुमला या बाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पत्नीची देखील चौकशी केली जाणार
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये पत्नीसोबत वाद झाल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमुद असं अभिषेकच्या पत्नीचं नाव असून ती ओमेक्स सिटी येथे राहते. त्या दोघांमध्ये नेहमीच विविध गोष्टींवरून वाद होत असायचा. त्यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. तसेच पत्नीची देखील चौकशी केली जाणार असून पोलिसांना घटनास्थळी काही वस्तू देखील सापडल्याने त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.