शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:31 PM

Crime News : हाडांच्या कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी विष देऊन जीवे मारल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. हाडांच्या कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी विष देऊन जीवे मारल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. तामिळनाडूतील सलेममध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह तीन जणांना अटक केली आहे. वडिलांनी पोटच्या मुलाला तीन औषधांचे मिश्रण असलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्य़ा माहितीनुसार, पेरियासामी असं आरोपी वडिलांचं नाव आहे. त्याचा 14 वर्षांचा मुलगा वन्नाथामिझान हा गेल्या एक वर्षापासून हाडांच्या कॅन्सरने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आपला मुलगा रात्रंदिवस वेदनेने तळमळताना पाहून पेरियासामी यांना त्रास व्हायचा. प्रयोगशाळा चालवणाऱ्या व्यंकटेशनशी पेरियासामीने संपर्क साधला. पेरियासामीने वेंकटेशनला आपल्या मुलाचा त्रास कसा कमी करता येईल, याबद्दल विचारलं होतं. 

तीन औषधांचे मिश्रण इंजेक्शनमधून दिले

पेरियासामी आणि वेंकटेशन यांनी प्रभू नावाच्या वैद्यकीय चिकित्सकाशी संपर्क साधला. प्रभू पेरियासामी याच्या घरी आला आणि त्याने 14 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त वन्नाथामिझन याला एक इंजेक्शन दिले, ज्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभूने तीन औषधांचे मिश्रण इंजेक्शनमधून दिले होते, ज्याच्या ओव्हरडोसमुळे मुलाचा मृत्यू झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पेरियासामी, वेंकटेशन आणि प्रभू यांना तामिळनाडूतील कोंगुनाप्रम पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका संतापलेल्या जावयाने दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीरपेंती ब्लॉकच्या एकचारी दियारा येथे ही भयंकर घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलालाही आगीच्या स्वाधीन केले. जावयाने तिघांवर पेट्रोल ओतताच, पेट्रोलच्या वासाने सासरे सुरेश मंडल यांना जाग आली. त्यावेळी जावयाने घरात कोणीही जिवंत राहणार नाही अशी धमकी दिली. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूIndiaभारतDeathमृत्यू